कृषी अधिकारी उसाची लागण कधी झाली? तोड कधी द्यायची? यामध्ये लक्ष देतात, पन उसाची रिकवरी कशी सुधारेल? यामध्ये लक्ष देत नाहीत, शरद पवारांनी व्यक्त केली खंत…

पुणे : वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या मार्फत आज हे एक चर्चासत्र आयोजित केलं. ज्याला महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशन आणि एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती या सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग होता. विषय मर्यादितच आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे जे तंत्रज्ञान आहे, शेतकऱ्यांच्या शेताला त्याचा वापर कसा करता येईल? उसाचं पीक असो, भाताचं पीक असो, फळबागा असोत किंवा अन्य पीकं असो. तिथपर्यंत हे कसं पोहोचवता येईल? यासंबंधीचा प्रयत्न आहे.
उसाचा जर विचार करायचा झाला तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यामध्ये आज आम्ही एक सामंजस्य करार केलेला आहे. त्या करारामार्फत हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचवता येईल? याचा विचार केला जाईल. यामध्ये ‘वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन’ आणि ‘राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ’ यांची सुद्धा फार मोठी मदत होईल. आज उसाचा क्षेत्र मोठं असलं तरी, उसामध्ये उत्पादनाच्या संदर्भात बरेचशा कमतरता आहेत.
त्या कमतरता दुरुस्त करण्यासाठी काही प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सध्या साखर कारखान्यांचं उत्पन्न यासंबंधी आधीच्या वक्त्यांनी या ठिकाणी अनेक विचार मांडले. बहुतेक कारखान्यांना पुरेसा ऊस नाही. त्यामुळे शंभर दिवस व त्यापेक्षा कमी दिवसाचं गाळप ही त्या ठिकाणची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कारखान्यांच्या मशिनरींचा पुरेपूर उपयोग केला जात नाही. अर्थकारणावर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून त्याचं उत्तर शोधलं पाहिजे आणि ते उत्तर म्हणजे दर एकरी उसाचं उत्पादन वाढवणं, हेच त्याला महत्त्वाचं उत्तर आहे.
त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर उसाच्या उत्पन्नात वाढ करणं. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त साखर आणि इथेनॉल सारख्या उपपदार्थाची निर्मिती करणं, हेच त्याला उत्तर आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उसाचं अर्थकारण हे बदलू शकतं. शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारायला मदत होऊ शकते. हजारो कोटी रुपये उत्पन्नाच्या माध्यमातून हे समाजाला मिळू शकतात. ते करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर राबवणं, हा कार्यक्रम आपल्याला हातात घ्यायचा आहे. त्यासाठी वसंतदादा इन्स्टिट्यूट, एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांचे तज्ञ एकत्र बसले. शेतावर वेदर स्टेशन कसं बसवायचं? शेल्टर कसा बसवायचा? त्याचा वापर कसा करायचा? ऊस उत्पादन वाढीसाठी त्याचा फायदा कसा होईल? याची माहिती ठिकठिकाणी कारखान्यांमध्ये जाऊन हे देणार आहेत.
हे देत असताना कारखान्यांमध्ये कृषी अधिकारी हा एक मोठा वर्ग आहे. माझी नेहमीची तक्रार आहे की, साखर कारखान्याचे कृषी अधिकारी हे फक्त उसाची लागण झाली कधी? उसाची तोड कधी द्यायची? आणि वाहतुकीची व्यवस्था कशी करायची? यामध्ये लक्ष देतात. पन उसाची वाढ कशी होईल? दर्जा कसा सुधारेल? रिकवरी कशी सुधारेल? यामध्ये ते लक्ष घालत नाहीत.
म्हणून सहकारी संस्था चालवणारे आमचे सगळे सहकारी जे आहेत, माझी त्यांना आग्रहाने सूचना आहे की तुमचं हे शेती खातं सुधारायच्या दृष्टीने पाऊलं टाका. आवश्यकता असली तर वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या वतीने तुमच्या शेती खात्याच्या अधिकाऱ्यांचे आम्ही या ठिकाणी शिकवणी घेऊ, सेशन घेऊ. हे तंत्रज्ञान काय आहे? या संबंधाचं मार्गदर्शन त्यांना करू. जेणेकरून ते आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अधिक चांगल्या प्रकारचं काम हे करू शकतो.