शेतकऱ्यांनो सोलापूरनंतर आता देशातील सर्वात मोठ्या बाजारपेठेतही कांद्याचे भाव घसरले! ‘या’ मार्केटमध्ये सर्वाधिक दर, जाणून घ्या…

पुणे : कांद्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासुन चढ उतार बघायला मिळत आहे. असे असताना काल राज्यातील अनेक बाजारांमध्ये कांद्याचे दर घसरले. यामुळे शेतकरी हतबल झाले. नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील बाजारांमध्ये कांद्याचे भाव कमी झाले आहेत.
यामुळे भाजारभाव नेमकं कधी वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आधीच कांद्याचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली असून पिकासाठी आलेला खर्च कसा भरून काढावा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.
पावसाचे लांबलेले पीक रोगराई यामुळे शेतकरी आधीच चिंताग्रस्त झाले आहेत. अशातच आता दर कमी झाले आहेत. काल लिलावात राज्यातील सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे. हा दर सर्वाधिक ठरला. इतर बाजारात मात्र कांद्याचे दर दबावातच पाहायला मिळाले.
कांदा बाजारमध्ये कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती: या बाजारात कांद्याला किमान 800, कमाल 3000 आणि सरासरी दोन हजाराचा भाव मिळाला. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात लाल कांद्याला किमान 618, कमाल 2310 अन सरासरी 1834 असा दर मिळाला तसेच पोळ कांद्याला येथे किमान 600, कमाल 2599 आणि सरासरी 2150 असा दर मिळाला.
तसेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1000, कमाल 2700 आणि सरासरी 1850 असा भाव मिळाला. तसेच सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती : येथे लोकल कांद्याला किमान 2000, कमाल 4000 आणि सरासरी 3000 असा भाव मिळाला. हा राज्यातील सर्वाधिक भाव ठरला.
दरम्यान, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात लाल कांद्याला किमान 300, कमाल 3250 आणि सरासरी 1900 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. तसेच कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 800, कमाल 3000 आणि सरासरी दोन हजाराचा भाव मिळाला.
तसेच अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये लोकल कांद्याला किमान 500, कमाल 2800 आणि सरासरी 1700 असा दर मिळाला. तसेच लाल कांद्याला किमान 450, कमाल 2651 आणि सरासरी 1700 असा भाव मिळाला. यामुळे आता पुढील काळात तरी याचे दर वाढणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.