लोणीकंद येथील अवैध धंद्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा बडगा ; 23 जण ताब्यात…!


लोणीकंद : गेल्या काही दिवसापासून अवैध धंद्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाईचा जोरदार धडाकाच लावला आहे . यातच आता लोणीकंद येथील अवैध धंद्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. यावेळी सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाच्या कारवाईत सुमारे ५५ हजार रुपयांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच 23 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक सुरक्षा विभागाने पुणे शहरातील अवैध धंदे बंद करून अवैध धंदेवाल्यामध्ये दहशत निर्माण केली आहे.

पुण्यातील केसनंद फाटा चौक, नगर रोड, लोणीकंद येथे पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबत गोपनिय माहिती बातमीदारा मार्फत मिळाली होती.

या ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवून छापा टाकला असता काही इसम बेकायदेशीर मटका जुगार पैसे लावुन खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने २३ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन मटका जुगारातील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकुण ५४,७९०/- रू.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले २३ इसमांविरूध्द लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुरन. २५६ / २०२३ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे , अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, अमित जमदाडे, किशोर भुजबळ यांच्या पथकाने यशस्वी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!