सोरतापवाडीत पुरोगामी विद्यालयात शिक्षकाकडून विद्यार्थींनीकडे अश्लील वर्तन; शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल..

उरुळी कांचन : सोरतापवाडी येथील (ता.हेवली) पुरोगामी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनीसोबत अश्लिल गैरवर्तन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शाळेतील शिक्षकाविरोधात पोक्सो अंतर्गत उरुळीकांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकासवर्धन बाबुराव वाघमारे (रा. नायगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.१५ वाजता आणि १३ ऑक्टोबर रोजी दुपारी २.४५ वाजता शाळेच्या मैदानावर तसेच स्टाफरूममध्ये हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


तसेच संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीच्या कमरेवर, पाठीवर आणि गालावर हात फिरवून तसेच तिच्या हाताला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.२४ वाजता उरुळीकांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४ आणि पोक्सो कायद्यातील कलम ८ व १२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब मत्रे करीत आहेत. उरुळीकांचन पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
