सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ! अचानक भाव वधारले; खरेदीसाठी हीच योग्य वेळ की आणखी वाट पाहावी?

पुणे : सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीनंतर गुरुवारी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींनी जोरदार उसळी घेतली. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दरात १,६०३ रुपयांची वाढ होऊन भाव १.२३ लाख रुपयांवर पोहोचला. तर चांदीच्या दरात प्रतिकिलो ४,४०२ रुपयांची वाढ झाली असून चांदीचा भाव १.४७ लाख रुपयांवर गेला आहे.
विशेष म्हणजे, बुधवारी चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. चांदी तब्बल ९,६८० रुपयांनी स्वस्त होऊन १.४३ लाख रुपये प्रतिकिलोवर आली होती. हा गेल्या १३ महिन्यांतील नीचांकी स्तर होता. दुसरीकडे, २४ कॅरेट सोन्याचा दरही ३,९०७ रुपयांनी घसरून १.२१ लाख रुपयांवर आला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी बाजारात खरेदीचा जोर वाढल्याने सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा तेजी पकडली.

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सलग घसरणीनंतर ग्राहक आणि गुंतवणूकदारांकडून खरेदी वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, बाजारातील अस्थिरता लक्षात घेता एकाच वेळी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने खरेदी करणे अधिक योग्य ठरू शकते, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

आजचा सोन्याचा भाव किती?
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) माहितीनुसार, शुक्रवार (२७ नोव्हेंबर) सकाळी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,२२,६४१ रुपये नोंदवण्यात आला आहे.

सोन्याचा प्रकार दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट ₹१,२२,६४१
२२ कॅरेट ₹१,२२,१५०
२० कॅरेट ₹१,१२,३३९
१८ कॅरेट ₹९१,९८१
१४ कॅरेट ₹७१,७४५
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील सोन्याचे दर
शहर दर (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ₹१,२२,६४१
ठाणे ₹१,२२,६४१
पुणे ₹१,२२,६४१
नागपूर ₹१,२२,६४१
कोल्हापूर ₹१,२२,६४१
जळगाव ₹१,२२,६४१
सांगली ₹१,२२,६४१
बारामती ₹१,२२,६४१
आजचा चांदीचा भाव किती?
IBJA नुसार, शुक्रवार (२७ नोव्हेंबर) सकाळी चांदीचा दर १,४७,३४७ रुपये प्रति किलो इतका नोंदवण्यात आला आहे.
