शरद पवार गटाचा मोठा निर्णय! सर्व खासदारांना तातडीने व्हीप जारी; दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग


मुंबई : केंद्रातील भाजप सरकारने ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात डिलिमिटेशन बिल सादर होण्याची शक्यता असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने आपल्या लोकसभेतील सर्व खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे.

पक्षाचे मुख्य प्रतोद खासदार अमोल कोल्हे यांनी हा व्हीप जारी केला आहे. विशेष अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीत सर्व खासदारांनी सभागृहात उपस्थित राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पक्षाकडून जो निर्णय घेतला जाईल, त्या भूमिकेला सर्व खासदारांनी पाठिंबा द्यावा, असेही व्हीपमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

डिलिमिटेशन बिलावरून राजकीय वातावरण तापले
केंद्र सरकारकडून विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन बिल मांडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीही संसदेत हे विधेयक मांडण्यात आले होते; मात्र त्यावेळी ते मंजूर होऊ शकले नव्हते. आता पुन्हा हे विधेयक आणण्याच्या हालचाली सुरू असल्याने सत्ताधारी आणि विरोधकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे विधेयक मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपकडून आवश्यक मतांची जुळवाजुळव केली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

डिलिमिटेशन बिलाला शरद पवार गटाचा पाठिंबा मिळणार?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून या विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली होती. सर्व राज्यांना समान जागा मिळणार असतील, तर विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करू, असे संकेत त्यांनी दिले होते.

त्यामुळे विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन बिल सादर झाल्यास शरद पवार गटाचे खासदार नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!