धक्कादायक!शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचं अपहरण, पाच आरोपींना अटक


पुणे : महाराष्ट्रातील शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो भाविक कानाकोपऱ्यातून येत असतात. अशातच आता दर्शनासाठी आलेल्या दोन भाविकांचं मालेगाव परिसरातून अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, टिपी प्रसाद राजू आणि जलंदर पोडाल असं अपहरण झालेल्या दोन भाविकांची नावं आहेत. दोघंही मुळचे ओडीसा राज्यातील रहिवासी असून ते महाराष्ट्रातील शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. शिर्डीला देव दर्शनासाठी जात असताना मालेगाव भागात त्यांचं अपहरण करण्यात आलं. अपहरणकर्त्यांनी या दोघांना मालेगावजवळील कौळाने येथील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवलं होतं.मात्र, या घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांतच अपहरणकांड उघडकीस आणलं. पोलिसांनी अपहरण झालेल्या दोन्ही भाविकांची सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाचही आरोपींना जेरबंद केले आहे.

दरम्यान मालेगाव पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने सूत्रे हलवली. पोलिसांनी कौळाने येथील हॉटेलवर छापा टाकला. पोलिसांच्या या कारवाईमुळे अपहरणकर्त्यांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. पोलिसांनी हॉटेलमध्ये डांबून ठेवलेल्या दोन्ही भाविकांची सुखरूप सुटका केली.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!