लाडक्या बहिणींना धक्का! आता ‘या’ महिलांना मिळणार नाही मे महिन्याचा हप्ता…


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

यानंतर आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मे महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटी जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता काही महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही. तुमचंही या लिस्टमध्ये नाव आहे की नाही ते जाणून घ्या.

लाडकी बहीण योजनेत आता अपात्र महिलांना मे महिन्याचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष ठरवण्यात आले आहे. या निकषांमध्ये ज्या महिला बसत नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

ज्या महिला सरकारी विभागात कार्यरत आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. महिलांकडे कोणतेही चारचाकी वाहन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० रुपयांपेक्षा जास्त नसावे. या महिलांना कधीच योजनेचा लाभ मिळणार नाही.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यात येऊ शकतो. लाडकी बहीण योजनेत मागील अनेक महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले आहेत. त्यामुळे या महिन्याचाही हप्ता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कधीही महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!