मराठा समाजाला ‘ते’ प्रमाणपत्र मिळणार.? समाज आक्रमक झाल्यानंतर शिंदे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…


मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेमुळे राज्यभरातील वातावरण देखील चांगलेच तापले आहे.

अनेक ठिकाणी याचा तीव्र निषेध देखील करण्यात आला आहे. एकीकडे मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाज आक्रमक झाला असताना दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकार आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत एक नियोजन जारी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बैठक होणार आहे.

या बैठकीला मराठा आरक्षण मंत्री उपसमितीमधील सर्व सदस्य मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना देखील बोलावले आहे.

या बैठकीत मराठा समाजाच्या महसुली व शैक्षणिक नोंदी, निजाम काळात संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, निजाम काळात झालेले करार, राष्ट्रीय दस्तऐवज व इतर कागदपत्रे, मराठा समाजातील लोकांची वंशावळ हे या समितीच्या बैठकीतले प्रमुख मुद्दे चर्चेले जाणार आहेत.

जालना येथे झालेल्या प्रकरणामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समितीची तडकाफडकी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!