शरद पवार यांचे पुढील चार दिवसांचे कार्यक्रम रद्द, प्रकृती बिघडल्याने घेतला निर्णय…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दौरे करत आहेत. असे असताना अचानक पुढील चार दिवसांचे त्यांचे दौरे रद्द करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आली आहे.
यामुळे याबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. गेले दोन दिवस शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये शरद पवार यांना बोलताना अडचण होत होती. तसेच पुण्यात देखील बोलताना त्यांना त्रास होत होता.
त्यानंतर आता शरद पवार यांच्या तब्येतीबाबत माहिती समोर आली आहे. शरद पवार यांची तब्येत ठीक नसल्याने पुढील चार दिवसाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.
शरद पवार यांना बोलताना खोकला येत आहे. यामुळे बोलण्यास त्रास होत आहे. म्हणून त्यांना कार्यक्रमात भाषण करण्यास अडचण निर्माण होत आहे. यामुळे पुढील चार दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यामुळे पवार आता विश्रांती घेणार आहेत.
दरम्यान, सध्या सर्वच नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मोर्चा बांधणीला लागले असून दौरे, गाठीभेटींचे सत्र सुरू झाले आहे. यामध्ये शरद पवार यांनी सुद्धा दौरे सुरू केले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.