शरद पवार यांचे 8 खासदार अजित पवार यांच्यासोबत सामील होणार? पवारांचाही पाठिंबा? राजकीय घडामोडींना वेग….

विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार गट बॅकफूटवर गेल्या असल्याचे बोलले जात आहे. कमी जागा मिळण्याने अनेकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. असे असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांचे ८ खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असून ते पक्षांतराची घोषणा करण्याची शक्यता आहे.
याबाबत काही माध्यमांनी अहवाल दिले आहेत. ही बाब शरद पवार यांच्या नेतृत्वाला मोठा धक्का मानली जात आहे, यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत अधिकृतपणे कोणी बोलत नसले तरी यावर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाने ‘खरा राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.
नंतर अजित पवार गटाला पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि नाव देण्यात आले. त्यांना अधिकृत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दर्जा देण्यात आला. पक्षाच्या जवळच्या सूत्रांनी असा दावा केला आहे की, शरद पवार हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी महायुती आघाडीत सामील होण्यास तयार आहेत.
तसेच केंद्रात सुप्रिया सुळे यांच्यासाठी मंत्रीपदासाठी लॉबिंग करत असल्याचा अंदाजही इतर विविध अहवालांमध्ये व्यक्त केला जात आहे. मात्र याबाबत शरद पवार गटाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे येणाऱ्या काळात काय घडणार हे लवकरच समजेल.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी फडणवीस हे आतापर्यंत राज्य सरकारचे एकमेव सक्रिय सदस्य असल्याचे म्हटले होते. ‘महायुती सरकारमधील बहुतांश मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारायचा आहे. केवळ एकच व्यक्ती जी खूप मेहनत घेत आहे, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस, असे म्हणत कौतुक केले होते.