Sharad Pawar : शरद पवारांना मोठा धक्का! पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी अचानक दिले राजीनामे, नेमकं कारण काय?


Sharad Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे.रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षातील नाराजी समोर आली.

माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न देता ऐनवेळी पक्षात आलेल्या श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे भुसावळ वरणगाव राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. Sharad Pawar

त्याचबरोबर आता माजी आमदार संतोष चौधरी देखील बंडाच्या तयारीत आहेत. यामुळे जळगावमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षातील नाराजी समोर आली आहे.

त्यामुळे आता आमदार संतोष चौधरी हे बंड करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामा दिल्याचे चित्र आहे. यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!