Sharad Pawar : मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मला आनंद…

Sharad Pawar : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात आंदोलनाचे रान उठवणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. रविवारी, जरांगे यांनी निवडणूक लढवणार असल्याचे मतदारसंघ जाहीर केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांनी आपला निर्णय बदलत उमेदवार मागे घेतले.
त्यानंतर आता मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, तिसऱ्या आघाडीचा कोणाशीही काही संबंध नाही. हा निर्णय मनोज जरांगेंचा आहे. मला आनंद आहे की त्यांनी हा निर्णय घेतला.
त्याचं एकच कारण आहे. ते सतत सांगत आहेत भाजपाला आमचा विरोध आहे. उमेदवार दिले असते तर त्याचा फायदा भाजपालाच झाला असता. त्यादृष्टीने त्यांचा निर्णय योग्य आहे”, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे. Sharad Pawar
दरम्यान, जरांगे पाटील यांना बारामतीतून आदेश गेला असावा. त्यामुळे त्यांनी रणांगणातून पळ काढला असावा, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.
मनोज जरांगे यांचा निवडणूक न लढण्याचा निर्णय हा त्यांचा निर्णय आहे. यात महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध नाही. जसा निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता तसाच निवडणूक न लढवण्याचा निर्णयही त्यांचाच आहे.’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.