Sharad Pawar : शरद पवार यांना सर्वात मोठा धक्का बसणार?, जवळचा नेता अजित पवारांच्या गटात जाणार, चर्चांना उधाण…


Sharad Pawar मुंबई : अजितदादा गटाचे कोणते आमदार शरद पवार यांच्या गटात सामील होणार अशी चर्चा रंगायलाही लागली. मात्र, ही चर्चा रंगण्यापूर्वीच अजितदादा गटाच्या एका मंत्र्याने मोठा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे. जयंत पाटीलच आमच्या संपर्कात आहेत, असा दावाच या नेत्याने केल्याने खळबळ उडाली आहे. Sharad Pawar

राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी माध्यमांशी संवादसाधताना हा गौप्यस्फोट केला. जयंत पाटील हे आमच्याकडे सुद्धा येऊ शकतात. ते आमच्या संपर्कात आहेत. त्यांचं आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांचं बोलणं सुरू आहे.

आठ आमदारांसह ते आमच्या पक्षात सामील होतील, असा दावा धर्मरावबाबा अत्राम यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. जयंत पाटील खरोखरच अजितदादा गटात जाणार का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

दरम्यान, खरी राष्ट्रवादी नेमकी कोणाची? यावरून केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टामध्ये देखील आमदार अपात्रता मुद्दा प्रलंबित आहे. यामध्येच एकमेकांचे आमदार फोडण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार गटाकडून शक्ती प्रदर्शन केले जात आहे.

अजित पवार गटाचे १५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला होता. त्यामुळे अजित पवार गटाला खिंडार पडण्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र धर्मरावबाबा आत्राम यांनी जयंत पाटील हे आमच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!