लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! नवरात्रीपूर्वी ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता खात्यात जमा…

मुंबई : राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी महत्त्वाची ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली असून, लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांत रक्कम जमा झाली आहे.
रक्षाबंधनापूर्वी जुलै महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर नवरात्रीपूर्वी ऑगस्ट महिन्याचा हप्ताही वितरित करण्यात आला. त्यामुळे लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्याप सप्टेंबर महिन्याचा हप्ता खात्यात जमा झालेला नसल्याने महिलांना त्याची प्रतीक्षा आहे.

मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून आवश्यक निधीची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी तब्बल ३३९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. शासन निर्णय जारी झाल्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली.


या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात. ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याकडे अनेक महिलांचे लक्ष लागले होते. अखेर हप्ता वितरित झाल्याने त्यांची प्रतीक्षा संपली आहे.
दरम्यान, ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा झाला आहे की नाही, हे महिलांनी स्वतः तपासून पाहावे. बँक खात्याचे पासबुक अपडेट करून किंवा खात्याशी संबंधित मोबाईलवर आलेला संदेश तपासून रक्कम जमा झाल्याची खात्री करता येईल.
