लज्जास्पद! मुंबई महापालिकेच्या बसमध्ये जोडप्याचे अश्लील चाळे, व्हिडिओ व्हायरल..

नवी मुंबई : नवी मुंबई येथे रविवारी सायंकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. पनवेल ते कल्याण दरम्यान धावणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या बसमध्ये एका तरुण जोडप्याने सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करत बसमध्येच शारीरिक संबंध ठेवले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बसमधील कंडक्टरवरच कारवाई सुरु करण्यात आली आहे. बसमध्ये जोडपे गैरवर्तन करत असतानाही कंडक्टरने त्यांना का थांबवले नाही? याचा जाब विचारण्यात आला आहे.
बस पनवेल ते कल्याण या दरम्यान जात असताना रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. रविवार, २० एप्रिल रोजी ही घटना घडली असून, प्रवासादरम्यान बसमध्ये जवळ कुणीही नव्हतं.
याचाच गैरफायदा घेत एका तरुण जोडप्याने मागच्या सीटवर असभ्य वर्तन केलं. ही घटना एका दुचाकीस्वाराने पाहिली आणि त्याने लगेच २२ सेकंदांचा एक व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ त्याने नवी मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला, त्यानंतर तो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला.
दरम्यान, या प्रकरणावर नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रतिक्रिया देताना सांगितलं की, बस कंडक्टरने वेळेत लक्ष न दिल्याने आणि योग्य ती कारवाई न केल्यामुळे त्याच्याविरोधात विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे. सध्या तरी पालिकेने पोलीसांकडे तक्रार दिलेली नाही.
या तरुण जोडप्याचे वय २० च्या आसपास असल्याचे सांगितले जात असून, त्यांनी सार्वजनिक ठिकाणी केलेले कृत्य भारतीय कायद्याच्या दृष्टीने गंभीर गुन्हा आहे. भारतीय न्याय संहिता कलम २९६ नुसार, सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्यास तीन महिने तुरुंगवास किंवा ₹१,००० पर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.