Shahajibapu Patil : शहाजीबापू पाटलांचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज, म्हणाले, गुलाल नाय उधळला तर फाशी घेऊन…

Shahajibapu Patil : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
शिवसेनेकडून सर्व 40 विद्यामान आमदारांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी गुवाहाटीला गेलेल्या सगळ्या सहकाऱ्यांना तिकीट देण्यात आलं आहे. सांगोल्यातून पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी तुफान टोलेबाजी केली आहे.
सांगोल्याचे विद्यामान आमदार शहाजीबापू पाटील यांनी माध्यमांशी माझाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत हा महाराष्ट्रात भुंकणारा कुत्रा आहे. Shahajibapu Patil
माझ्याविरोधात संजय राऊत, त्याचा बाप, आजा यांनी एक नाही तर दहा सभा घेऊ देत…मी त्याला पालथा पाडून तुडवून पुढे जाऊन दाखवणार…उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाहीय.
माझ्यावर टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे काही मुद्दाच नाही, असे शहाजीबापू पाटील म्हणाले. आज संजय राऊतांना सांगतो, तुम्ही सात-आठ सभा घ्या, मी विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन, असंही शहाजीबापू पाटील यांनी सांगितले आहे.