हवेली ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष गायकवाड ; उपाध्यक्षपदी दादाभाऊ नाथ यांची बिनविरोध निवड ….

उरुळीकांचन : हवेली ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष गायकवाड तर उपाध्यक्षपदी दादाभाऊ नाथ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या अध्यक्ष अमोल घोळवे, कोषाध्यक्ष संतोष भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हवेली तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची कार्यकारीणी समिती जाहीर करण्यात आली.
यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष गायकवाड व उपाध्यक्ष दादाभाऊ नाथ यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हवेली तालुका कार्यकारणीत नंदकुमार चव्हाण, स्वाती राजगुरू, रेखा ताठे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडीनंतर संतोष गायकवाड म्हणाले, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या माध्यमातून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी वर्गांचा समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. कर्मचारी, अधिकारी न्याय हक्कांसाठी तत्पर राहणार असल्याचेही म्हणाले.