शिवसेना जिल्हा संघटक निलेश काळभोर यांना ठार मारण्याच्या प्रयत्नातील मुख्य आरोपीला जेरबंद करा; दोन संघटनांची मागणी

लोणी काळभोर : शिवसेना (शिंदे गट) पुणे जिल्हा संघटक निलेश अशोक काळभोर यांना जिवे ठार मारण्यांचा प्रयत्न व धमकी देणाऱ्या मुख्य सुत्रधारास तात्काळ जेरबंद करण्याची दोन संघटनांकडून मागणी करण्यात आली आहे.

१९ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील माईलस्टोन हाँटेलमध्ये घुसून तिन जणांनी पिस्तूल व चाकू दाखवून निलेश दादा काळभोर कोठे आहे? त्याचा गेम वाजवायचा आहे. असे म्हणून दशहत माजवली होती.
याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने प्रणवराज यादव व जय शेलार यांना अटक केली आहे. सदर प्रकार घडून दिड महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी मुख्य आरोपी अस्लम अल्ताफ शेख अद्यापही मोकाट फिरत आहे.

पपसदर प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून आरोपी मोकाट फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण निलेश काळभोर हे सामाजिक कार्यात सभागी असतात तसेच समाजातील समस्या सोडवण्यासाठी त्यांना दररोज जनतेच्या संपर्कात राहावं लागते अश्या परिस्थीतीत त्यांच्या जीवितास काही झाले तर पोलीस प्रशासन जबाबदार राहिल किंवा आरोपी मिळेपर्यंत त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे.

तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींचा तात्काळ शोध घेण्यात यावा व त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळ व रौद्रशंभो प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आली आहे.