Sanjay Malhotra : केंद्र सरकारची मोठी घोषणा, संजय मल्होत्रा असणार आरबीआयचे नवे गव्हर्नर…

Sanjay Malhotra : संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर असणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी नवे गव्हर्नर म्हणून त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. ते आता आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास यांची जागा घेतील. दास यांचा कार्यकाळ १० डिसेंबर रोजी संपत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी, ११ डिसेंबर रोजी संजय मल्होत्रा नवीन गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारतील. संजय मल्होत्रा हे १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी असणार आहे. सध्या ते महसूल सचिवपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
संजय मल्होत्रा हे राजस्थान केडरचे १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते नोव्हेंबर २०२० मध्ये REC चे अध्यक्ष आणि MD झाले. याआधी ते ऊर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. २०२२ मध्ये, वित्तीय सेवा विभागाचे सचिव संजय मल्होत्रा यांचे केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे संचालक म्हणून नामनिर्देशन केले. Sanjay Malhotra
दरम्यान, ११ डिसेंबर रोजी संजय मल्होत्रा RBI चे नवे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ पुढील ३ वर्षांचा असेल. ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे २६ वे गव्हर्नर असतील. वास्तविक, रिझर्व्ह बँकेचे कामकाज केंद्रीय संचालक मंडळ पाहते आणि अशा परिस्थितीत संजय मल्होत्रा यांना या कामाचा दीर्घ अनुभव आहे, त्यामुळे ते आरबीआयच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत आघाडीवर राहिले.