ठरलं! संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परंपरेनुसार विसाव्यासाठी उरुळी कांचन गावात थांबणार


उरुळी कांचन : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरळी कांचन (ता. हवेली) गावात परंपरेनुसार विसाव्यासाठी थांबणार आहे. असे पालखी सोहळ्याच्या विश्वस्त मंडळाने जाहीर केले आहे. यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

देशात आज तीव्र उष्णतेची लहर तर काही ठिकाणी वादळी पाऊस, गारपीट; अचानक वातावरणात बदल..

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसाव्यासाठी उरुळी कांचन येथील काळभैरवनाथ मंदिरात नेण्यास नकार दिला होता. हा नकार पालखी सोहळा प्रमुखांनी दिला असल्याने पालखी सोहळ्याच्या या भूमिकेची उरुळी कांचन ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती

पुण्यात सराईत गुन्हेगारावर गोळीबार, परिसरात भीतीचे वातावरण..

त्यानंतर ग्रामस्थांनी यासंदर्भात उरुळी कांचन येथे एक बैठक घेतली आहे. जर पालखी सोहळा परंपरेनुसार गावात आला नाही तर , सत्याग्रह, गावबंद आंदोलन, रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.

शिंदे-फडणवीस सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना फसवी; नाना पटोलेंचा घणाघात

दरम्यान, आज मंगळवार (ता.६) अखेर संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रमुखांनी पालखी सोहळा परंपरेनुसार ग्रामदैवताच्या मंदिरासमोर आरती घेणार असून, त्यानंतर पालखी सोहळा महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर विसाव्यासाठी २ तास थांबणार आहे. असे जाहीर केले आहे.

विजपुरवठा सुरळीत नाही केला तर महावितरणच्या विरोधात आंदोलन करणार आमदार अशोक पवार

एकीकडे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परंपरेनुसार उरळी कांचनला विसाव्यासाठी थांबणार असल्याचे पालखी सोहळ्याच्या विश्वस्त मंडळाने जाहीर केले आहे. तर दुसरीकडे लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी येणार की नाही. याचा निर्णय झाला नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!