Rohit Pawar : रोहित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर अजित पवारांना हिनवले, म्हणाले, बच्चा बडा हो गया….


Rohit Pawar : पुणे जिल्ह्यातील नवीन तर देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात दुरंगी लढत झाली. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे एक लाखावरुन अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत.

अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत झाल्या आहेत. महायुतीमध्ये अजित पवार यांचा पक्ष केवळ एका जागेवरच विजय मिळणार आहे. सुळेंच्या निर्णायक विजयावर आमदार रोहित पवार यांनी X पोस्ट करत अजित पवारांवर टीका केला आहे. Rohit Pawar

रोहीत पवार यांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे की, काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झालीय; पण त्यांना सांगायचंय की, नेता बनण्याची घाई नाही तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलं त्याचा स्तर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झालीय.

बारामतीत सुप्रियाताईंचा विजय हा आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचा, सुप्रियाताईंच्या कष्टाचा, मविआचे सर्व पदाधिकारी व सामान्य कार्यकर्ते यांच्या त्यागाचा आणि दडपशाहीला झुगारलेल्या स्वाभिमानी सामान्य जनतेच्या प्रेमाचा आहे. या दणदणीत विजयाबद्दल सुप्रियाताईंचं मनापासून अभिनंदन!, असेही आमदार रोहित पवार एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!