असा दरोडा ज्याने तोडले रेकॉर्ड!! संभाजीनगरमध्ये बड्या उद्योजकाच्या घरावर दरोडा, डोक्याला बंदूक लावून 8 किलो सोनं, 40 किलो चांदी लुटली


छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठा दरोडा घडल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर येथील उद्योजक संतोष राधाकिशन लड्डा यांच्या निवासस्थानी मोठा दरोडा पडला. यामध्ये दरोडेखोरांनी तब्बल 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी, असा कोट्यवधींचा ऐवज चोरला आहे.

संतोष लड्डा यांचा मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी आहे. त्याला भेटण्यासाठी लड्डा कुटुंब आठ दिवसांपूर्वी परदेशात गेले होते. लड्डा कुटुंब विदेशात असल्याचा फायदा घेत सहा दरोडेखोरांनी हे कृत्य केले आहे. दरोडेखोरांनी घरात असलेल्या ड्रायव्हर आणि केअरटेकरच्या हातपाय बांधून त्याला बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला. यामुळे त्यांना काही करता आले नाही.

चोरटयांनी केअरटेकरच्या डोक्यावर बंदूक ठेवत धमकी देत त्यांनी संपूर्ण घराची झडती घेतली. यामध्ये त्यांनी मौल्यवान दागिने व चांदी चोरून नेले. सुमारे 8 किलो सोने आणि 40 किलो चांदी दरोडेखोरांनी चोरून नेले. याठिकाणी सध्या पोलिसांचं पथक, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज चेक करत असून त्यावरून आरोपींचा माग काढण्याचे काम सुरु आहे. या घटनेमुळे वाळूज परिसरातील उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे वेगात फिरवली आहेत. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. घटनेने मात्र खळबळ खळबळ उडाली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. घटनास्थळी महत्त्वाचे ठसे आणि पुरावे गोळा करण्यात आले आहेत. त्यानुसार तपास सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!