‘राजीनामा द्या नाहीतर तुमचा बाबा सिद्दीकी करू’ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना धमकीचा मुंबई पोलिसांना मेसेज …!!

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या
प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला एका अनोळखी मोबाईल नंबरवरून मेसेज संदेश आला आहे. या संदेशात ‘योगी आदित्यनाथ यांनी 10 दिवसांत राजीनामा द्यावा. नाही तर आम्ही त्यांना बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणे मारून टाकू’ असा मजकूर नमूद केला आहे.त्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
2024 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. यूपी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून धमक्या देणाऱ्यांना अटक केली. कधी फेसबुक-एक्सच्या माध्यमातून तर कधी पोलिसांना मेसेजद्वारे या धमक्या आल्या आहेत. कधी फेसबुक-एक्सच्या माध्यमातून तर कधी पोलिसांना मेसेजद्वारे या धमक्या आल्या आहेत.