वाहतूक कोंडीला दिलासा! ‘मिसिंग लिंक’चा एक टप्पा सुरू, दुसरा ‘या’ दिवशी खुला…


पुणे : मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर शुक्रवारी झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीनंतर आज प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोणावळा घाटात काल वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, आज सकाळपासून दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक सुरळीत सुरू असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे.

दरम्यान, बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाबाबतही महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘मिसिंग लिंक’वरील मुंबई ते पुणे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या प्रवाशांना आता नव्या, वेगवान मार्गाचा फायदा होणार आहे.

या नव्या मार्गामुळे घाटातील धोकादायक वळणांना पर्याय उपलब्ध झाला असून, प्रवासाचा वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होत आहे. तसेच, वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीतूनही मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

मात्र, पुणे ते मुंबई जाणारी मार्गिका अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. ही लेन सुरू होण्यासाठी प्रवाशांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार असून, साधारण २ ते ३ दिवसांत ती खुली होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

लाँग विकेंड आणि प्रकल्पाच्या प्रारंभामुळे शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. परंतु, आज स्थिती पूर्णपणे सुधारली असून एक्स्प्रेसवेवर कुठेही वाहनांची अडवणूक नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!