आरबीआयचा मोठा निर्णय! 100 आणि 200 च्या नवीन नोटा आणणार, कारणही सांगितलं…

नवी दिल्ली : आरबीआयने 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा छापण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा लवकरच जारी केल्या जाणार आहेत. मात्र, याच्या डिझाईनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. असे असताना या नोटा का काढल्या जाणार याची चर्चा सुरू झाली आहे. नव्या नोटांवर गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांची सही असेल. ही एक नियमित प्रक्रिया आहे, असेही सांगितले जात आहे.
ज्यामध्ये नव्या गव्हर्नरची नियुक्ती झाल्यानंतर त्यांची सही असलेल्या नोटा जारी केल्या जातात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य गव्हर्नर म्हणून सजय म्हलोत्रा यांनी कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्यापूर्वी शक्तिकांत दास हे हे मुख्य गव्हर्नर होते. यामुळे काही निर्णय घेण्यात आले आहेत.
शक्तिकांत दास यांच्या जागी मुख्य गव्हर्नर म्हणून निवड झाल्यानंतर संजय म्हलोत्रा यांनी पहिल्याच तिमाहीत रेपो रेट घटवला होता. शक्तिकांत दास यांची त्यानंतर पीएमओमध्ये नियुक्त करण्यात आली. केंद्र सरकारने 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा जारी केल्या होत्या.
असे असताना मात्र, त्यानंतर आरबीआयनं पुन्हा 2000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आता संजय म्हलोत्रा हे गव्हर्नर झाल्यानं त्यांच्या सहीच्या नोटा छापल्या जाणार आहेत. हा नियमित प्रक्रियेचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला नोटबंदी जाहीर केली होती. तेव्हा मोठा गोंधळ उडाला होता.
नोटबंदीवेळी त्यावेळी बाजारात असलेल्या 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. दरम्यान, सध्या नव्या नोटांप्रमाणं जुन्या नोटा देखील वैध असतील. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार या नोटा लवकरच बँका आणि एटीएममध्ये उपलब्ध असतील.