उरुळीकांचन’ च्या माहेर हॉस्पिटलकडून गर्भपाताचे रेकॉर्ड गायब..

मोटे दापत्यांवर गर्भपात , निदान व बेकायदेशीर कृत्ये आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल ....


उरुळी कांचन : उरुळीकांचन (ता.हवेली) येथील माहेर हॉस्पिटलच्या डॉक्टरवर बेकायदेशीरपणे गर्भपात केल्याचा सहभाग उघड झाल्यानंतर केडगावच्या महिला गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल
झालेल्या डॉ. तुकाराम मोटेसह त्याच्या पत्नीवर गर्भपाताचे रेकॉर्ड संशयास्पद रितीने गायब करणे आणि नोंदी न ठेवल्याप्रकरणी उरुळीकांचन पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

डॉ. तुकाराम मोटे आणि त्याची पत्नी राजश्री मोटे (रा. माहेर हॉस्पीटल, उरुळी कांचन, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दांपत्याचे नाव आहे. याबाबत डॉ. किशोर गजानन पत्की, (वय -44) व्यवसाय नोकरी ग्रामीण रुग्णालय, यवत ता. दौंड) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण रुग्णालय यवत येथे कार्यरत असलेले डॉ. किशोर पत्की यांनी उरुळी कांचन येथील माहेर हॉस्पिटलमध्ये आरोग्य विभागाने तपासणी केली. यावेळी 9 जानेवारी 2025 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत धक्कादायक बाबी समोर आल्या. आरोपी डॉ. तुकाराम मोटे आणि त्याची पत्नी राजश्री तुकाराम मोटे यांनी संगनमत करून रुग्णालयातील गर्भपाताचे (MTP) रेकॉर्ड मुद्दाम अद्ययावत ठेवले नाही. तपासणी समितीला रुग्णालयातील अनेक महत्त्वाचे कागदपत्र आणि रेकॉर्ड अत्यंत संशयास्पद स्वरूपाचे आढळून आले.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, माहेर हॉस्पिटलमध्ये रुग्णांची (महिलांची) कोणतीही कायदेशीर संमती न घेता काही गर्भपात उरकण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच, वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार गर्भपात झाल्यानंतर 3 तासांच्या आत अधिकृत फॉर्म भरणे अनिवार्य असते. मात्र, डॉ. मोटे दांपत्याने हा नियम पूर्णपणे धाब्यावर बसवून कोणत्याही फॉर्मची नोंद वेळेत केली नाही. हा सर्व प्रकार गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपाताचे रॅकेट लपवण्यासाठीच केला गेल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, या गंभीर प्रकारानंतर उरुळी कांचन पोलिसांनी डॉ. तुकाराम मोटे आणि राजश्री मोटे यांच्याविरुद्ध लिंग निवड प्रतिबंधक अधिनियम 1994 (PCPNDT Act) च्या विविध कलमांन्वये उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक फौजदार मत्रे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!