RBI करणार धमाका! घर, वाहनांचा सर्वांचा हप्ता होणार कमी, सर्वसामान्यांना अच्छे दिन येणार..

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच व्याजदरात कपात करू शकते, रॉयटर्सच्या अहवालात अर्थशास्त्रज्ञांच्या एका सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह बँक एप्रिलमध्ये होणाऱ्या बैठकीत व्याजदर कमी करू शकते त्यानंतर, ऑगस्टमध्ये आणखी एक कपात होऊ शकते. असे झाल्यास हे व्याजदर कपातीचे सर्वात कमी कालावधीचे प्रमाण असणार आहे.
नवीन आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत रिझर्व्ह बँक व्याजदरात कोणताही बदल करण्याची अपेक्षा नाही. या संपूर्ण चक्रात एकूण ७५ बेसिस पॉइंट्सची कपात केली जाईल त्यामुळे, २००० च्या दशकाच्या सुरुवातीपासून व्याजदर कपातीचा हा सर्वात कमी कालावधी असणार आहे. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला आरबीआयने रेपो रेटचा वापर मुख्य धोरणात्मक साधन म्हणून करण्यास सुरुवात केली.
अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, १८ ते २७ मार्च दरम्यान केलेल्या या सर्वेक्षणात६० पैकी ५४ अर्थतज्ज्ञांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एप्रिलमध्ये २५ बेस पॉईंट्सची रेपो रेट कपात करून व्याजदर ६ टक्क्यांवर कमी करण्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे अनेकांचे हप्ते देखील कमी होतील. याबाबत ७ ते ९ एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीनंतर व्याजदर कपात जाहीर केली जाईल.
यामुळे रिझर्व्ह बँक ९ एप्रिल रोजी व्याजदरात कपात करण्याची घोषणा करू शकते. तसेच या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था ६.४% दराने वाढण्याचा अंदाज आहे, जो गेल्या चार वर्षातील सर्वात कमी दर असेल. याआधी फेब्रुवारीमध्ये भारतातील महागाई दर ३.६१% पर्यंत घरून गेल्या सात महिन्यांतील नीचांकी पातळीवर आला.
त्यामुळे, रिझर्व्ह बँकेकडे व्याजदर कमी करण्याची संधी आहे. एमपीसीची शेवटची बैठक फेब्रुवारी २०२५ मध्ये नवीन आरबीआय नवनियुक्त प्रमुख संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली झाली होती, जिथे पहिल्यांदाच रेपो दर एक चतुर्थांश पॉइंटने कमी करून ६.२५% केला गेला होता. यामुळे पुढील काही काळात याबाबत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय मध्यमवर्गाला दुहेरी आनंद देण्याची तयारी करत आहे.