रामेश्वरम कॅफेमधील स्फोट प्रकरणी २ फरार आरोपी ताब्यात; एनआयएला मोठं यश


नवी दिल्ली : बंगळुरुतील रामेश्वरम कॅफेमधील स्फोट प्रकरणातील एनआयएला मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणी आणखी एका आरोपीला पकडण्यात आलं आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) शुक्रवारी रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन फरार आरोपींना कोलकाता जवळून अटक केली आहे.

मुसावीर हुसैन शाजिब आणि अदबुल मतीन अहमद ताहा यांना अटक करण्यात आल्याची आरोपींचे नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुसावीर हुसैन शाजिब आणि अदबुल मतीन अहमद ताहा यांना कोलकाताजवळ अटक करण्यात आली आहे. एनआयएला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे याा प्रकरणाशी संबंधित अधिका-यांनी सांगितले की, शाजिब हाच व्यक्ती होता ज्याने कॅफेमध्ये इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) ठेवले होते.

१२ एप्रिल रोजी सकाळी फरार आरोपी अब्दुल माथिन ताहा आणि मुसाविर हुसेन शाजेब हे कोलकाताजवळ दिसले होते. दोन्ही आरोपी आपली ओळख लपवून कोलकात्यात राहत होते.गेल्या महिन्यात एनआयएने या दोन आरोपींची माहिती देणा-यास प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!