Ramdas Athawale : रामदास आठवले यांचा भाजपला थेट इशारा; म्हणाले, लोकसभेप्रमाणेच विधानसभेला करू नका, अन्यथा…


Ramdas Athawale : लोकसभेसाठी शिर्डीतून मी उमेदवारी मागितली होती. मिळाली नाही. मी पंतप्रधान मोदी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की राज्यातूनच तुमचे नाव आले नाही, यामुळे विधानसभेसाठी असे करू नका अन्यथा रिपाइंला गृहीत धरू नका. असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री तथा भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपला दिला आहे.

केंद्रीय राज्यमंत्री आठवले नुकतेच नगर येथे एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देशपातळीवर मला केंद्रीय मंत्रिपद मिळाले असले, तरीही महाराष्ट्रातील महायुतीच्या सत्तेत रिपब्लिकन पक्षाला भागीदारी मिळाली नाही. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विचारात घेतले जात नाही, स्थानिक पातळीवरदेखील सम्मान मिळत नाही.

ते पुढे म्हणाले की, सन २०१२ पासून रिपाई भाजप-शिवसेना युतीबरोबर आहे. केंद्रात मला तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळाले, हे खरे असले तरी महाराष्ट्रातील सत्तेत स्थान मिळाले नाही. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर रिपाइंला प्रतिनिधित्व दिले जाईल, असे दोन वर्षापासून सांगितले जात आहे. Ramdas Athawale

मात्र अद्याप मंत्रिपद मिळाले नाही. स्थानिक पातळीवर कोणत्याही योजनेच्या कार्यक्रमास पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बोलावले जात नसल्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते सांगतात. हा एक प्रकारे अपमानच आहे. परंतु मान आणि अपमान पचवण्याची सवय असल्यामुळे महायुतीचरोबरच राहाणार आहोत.

मोदी सरकार आल्यानंतर संविधान बदलले जाणार आहे. आरक्षणदेखील बदले जाणार आहे. अशा अफवा विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत पसरवल्या, त्याचा फटका महायुतीला सहन करावा लागला. महाराष्ट्रात ४० जागा महायुतीच्या पदरात पडतील अशी अपेक्षा होती. मात्र, १७ जागांवरच समाधान मानावे लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!