राज्यात पुन्हा पावसाचा कहर!! आता पुढील दोन दिवस ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता, जाणून घ्या…

पुणे : सध्या बंगालच्या उपसागरावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस ढगाळ हवामान राहण्याचा आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले असून पिके काढणीला आली आहेत. त्यामुळे बंगालच्या उपसागरावरून प्रामुख्याने दक्षिण विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे येत आहेत. यामुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे याठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सध्या या भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील थंडीही या बाष्पयुक्त वाऱ्यामुळेच कमी झाली. बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम आहे. यामुळे असे बदल वातावरण दिसुन येत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याठिकाणी साधारण पुढील चार दिवस ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच १५ जानेवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतीची कामे उरकून घ्यावी लागणार आहेत.
दरम्यान, हिमालयात बुधवारपासून पश्चिमी विक्षोप सक्रीय होण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम म्हणून उत्तर भारतात पुन्हा थंडीत वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यामुळे काही ठिकाणी थंडी कमी झाली आहे. तसेच काही ठिकाणी वाढली आहे.
आता थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात किमान पारा खाली जाण्याचा अंदाज आहे. यामुळे येणाऱ्या काळात हे बदल दिसून येण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.