Rahul Kul : उनजी धरणाच्या फुगवटा क्षेत्रातील बाधित १२८ घरांचे पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करा, आमदार राहुल कुल यांची अधिवेशनात मागणी..


Rahul Kul : उजनी धरणाच्या संपादित क्षेत्रात येणाऱ्या खानोटा गावाचे अंशतः पुनर्वसन झाले आहे. उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रातील ओलाव्यामुळे बाधित १२८ घरांचे संपादन व पुनर्वसन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी अधिवेशनातं केली आहे

तसेच दौंड तालुक्यातील १९७५ पूर्वी पुनर्वसन झालेल्या गावठाणांना विकास कामासाठी निधी मिळण्याबाबत दाखल करण्यात आलेला प्रस्ताव लालफितीत अडकला आहे. त्यास मान्यता देण्यात यावी, पुनर्वसन झालेल्या जमिनीवर वर्ग २ चे लागलेले शेरे कमी करण्याबाबत शासनाने आदेश दिले आहे. Rahul Kul

अद्याप देखील शेरे कमी झालेले नाहीत याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित त्यांनी केला आहे. तसेच शासनाने तातडीने याबाबत आवश्यक कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी खानोटा, (ता. दौंड) येथील पुनर्वसन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे व याबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती कुल यांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!