पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! PMPML च्या ताफ्यात तब्बल ‘इतक्या’ बसची भर पडणार…


पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक सक्षम करण्यासाठी PMPML च्या ताफ्यात १००० नव्या CNG बसचा समावेश होणार आहे.

तसेच हा निर्णय पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सहभागातून घेण्यात आला आहे. या नव्या बसच्या समावेशामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक आरामदायक, वेळेवर आणि कार्यक्षम होणार आहे, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे सध्याच्या सतत नादुरुस्त होणाऱ्या जुन्या बसला बाजूला काढून नवीन सुविधा देण्यात येणार आहेत. PMPML संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पुणे महापालिकेने ३००, पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०० आणि PMRDA ने ५०० बस खरेदीसाठी पुढाकार घेतला आहे. एका १२ मीटर लांबीच्या CNG बसची किंमत सुमारे ४८ लाख रुपये असून, एकूण खर्चात PMRDA कडून २३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार, या योजनेत पुणे महापालिका ६० टक्के आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ४० टक्के निधी उभारणार आहे. PMPML चे संचालक आणि पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

सध्या PMRDA च्या हद्दीत १२२ मार्गांवर ५०३ बस कार्यरत आहेत. नव्या ५०० बस मिळाल्यानंतर या सेवा आणखी बळकट होतील. PMRDA कडून PMPML ला या बस स्वमालकीच्या तत्त्वावर दिल्या जाणार आहेत. त्यामुळे PMRDA हद्दीत अधिक कार्यक्षम आणि नियमित सेवा उपलब्ध होईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!