पुणेकरांनो काळजी घ्या! १२८ वर्षांचा उष्णतेचा विक्रम मोडला, आजचं तापमान किती?, जाणून घ्या..


पुणे : पुण्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून, काल १२८ वर्षांचा विक्रम मोडून तापमानाने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. एप्रिल महिन्यात नेहमीपेक्षा जास्त तापमान नोंदवलं जात असून, पुणेकर अक्षरशः उन्हाने हैराण झाले आहेत.

पुणे वेधशाळेच्या नोंदीनुसार, पुणे शहराचा पारा हा ३० एप्रिल १८९७ नंतर म्हणजे तब्बल १८ वर्षांपूर्वी १८९७ अंशांवर गेला होता. लोहगाव परिसरात गेल्या चार दिवसांपासून पारा ४३ अंशांवर स्थिर आहे. पुणे वेधशाळेच्या नोंदीनुसार, यापूर्वी ३० एप्रिल १८९७ रोजी असं तापमान नोंदवण्यात आलं होतं.

त्यामुळे तब्बल १२८ वर्षांनी पुण्याने उष्णतेचा नवा इतिहास लिहिला आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच असा विक्रमी उष्मा जाणवणं ही पुण्यासाठी दुर्मिळ बाब मानली जाते.

आज पुण्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सियस, तर किमान तापमान २३ अंश इतकं नोंदवलं जात आहे. पुढील काही दिवस तापमानात घट होण्याची शक्यता फारशी नाही. हवामान विभागाकडून नागरिकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, याशिवाय सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणं टाळावं, भरपूर पाणी प्यावं आणि थंड पदार्थांचा वापर करावा, असं आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!