Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाला गाडी देऊन चूक केली, विशाल अग्रवालने अखेर आपली चूक केली मान्य, चौकशीत नेमकं काय घडलं?


Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाने शनिवारी मध्यरात्री दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवत एका बाईकला धडक दिली आणि त्यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी त्या मुलाला अटक करण्यात आली तर घटनेनंतर फरार झालेल्या त्या मुलाचे वडील, अर्थात विशाल अग्रवाल यांना मंगळवारी छ. संभाजीनगर येथून अटक केली.

अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देऊन चूक केली अशी कबुली विशाल अग्रवाल याने पोलिसांसमोर दिली आहे. काल विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची कोठडी ठोठावण्यात आली.

पोलिसांच्या चौकशी दरम्यान विशाल अग्रवाल यांनी चुकीची कबुली दिली. अल्पवयीन मुलाला गाडी देऊन चुकीच असल्याचं कबूल करत झालेल्या प्रकाराबाबत विशाल अग्रवाल यानेही खंतही व्यक्त केली आहे. Pune Porsche Accident

पोलिसांनी काल विशाल अग्रवाल याला सत्र न्यायालयात हजर केले असता विशाल अग्रवाल यांच्यासह तिघांना २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी पुणे पोलिसांकडून युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकिलांनी विशाल अग्रवाल यांच्यासह तीन आरोपींची ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली होती.

कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर विशाल अग्रवालसह तिघांना २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. विशाल अग्रवाल यांच्यसह बार चालक जितेश शेवनी आणि जयेश बोनकर या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!