Pune Porsche Accident : आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणे महागात पडले! ससून रुग्णालयातील ३ जणांचे निलंबन…

Pune Porsche Accident : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. बेदरकारपणे आपल्या बापाच्या महागड्या कारनं दोघांना चिरडणारा धनिकपुत्र आणि अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी संपूर्ण प्रशासन कामाला लागल्याचे धक्कादायक वास्तवही या प्रकरणात समोर आले आहे.

तसेच आरोपी अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी चौकशी समितीने शासनाला अहवाल सादर केला असून या प्रकरणी डॉ. अजय तावरे, डॉ. हळनोर यांच्यासह शिपायाला निलंबित करण्यात आले आहे.
अजय तावरेंच्या सांगण्यावरून हरनोळ आणि घटकांबळेंनं आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्याचा कटाचा मास्टरमाईंड ससूनचा डॉक्टर तावरेच असल्याचं समोर आलंय. सध्या या तिन्ही जणांचं निलंबन करण्यात आले आहे.

डॉ. तावरे हे ससूनच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत तर डॉ. हळनोरहे या विभागात कार्यरत आहे. आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवाल यांनी २० मे रोजी डॉ. तावरे यांच्याशी १४ वेळा संपर्क साधून त्यांना रक्ताचे नमुने बदलण्यास सांगितले होते.

त्यानंतर आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने हे कचऱ्यात फेकून देण्यात आले होते. पुणे पोलिसांनी आरोपी मुलाच्या रक्ताचे नमुने हे औंध रुग्णालयात देखील पाठवले होते. या मुळे दोन्ही डॉक्टरचे बिंग फुटले. सध्या तिघांनाही पुणे पोलिसांनी अटक केली असून त्यांना ३१ मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.