लाडक्या बहिणींना बाप्पा पावणार! ऑगस्टचा 1,500 हप्ता लवकरच खात्यात; ‘या’ तारखेला पैसे जमा होण्याची शक्यता…


पुणे : राज्यभरातील महिलांचे लक्ष लागून राहिलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जुलै महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या ₹1,500 हप्त्याची लाभार्थी महिलांकडून प्रतीक्षा केली जात आहे. हा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारकडून ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या हप्त्याच्या वितरणाबाबत प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आल्याची माहिती आहे.

1 कोटी 66 लाख महिला पात्र

योजनेतील लाभार्थी महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थी महिलांची संख्या सुमारे 1 कोटी 66 लाख इतकी असल्याचे समोर आले आहे. या पात्र महिलांना ऑगस्ट महिन्याचा प्रत्येकी ₹1,500 हप्ता दिला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हप्ता वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून टप्प्याटप्प्याने लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची तयारी केली जात आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)च्या माध्यमातून ही रक्कम थेट खात्यात जमा केली जाणार आहे.

तांत्रिक प्रक्रियेमुळे विलंब

ऑगस्ट महिन्याचा हप्ता वेळेत मिळेल, अशी अपेक्षा लाभार्थी महिलांना होती. मात्र, काही तांत्रिक अडचणी तसेच प्रशासकीय मंजुरीच्या प्रक्रियेमुळे हप्ता वितरणाला विलंब झाल्याचे सांगितले जात आहे.

सध्या निधी वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.

अधिकृत घोषणेकडे लक्ष

जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

मात्र, ऑगस्टचा हप्ता नेमक्या कोणत्या तारखेला जमा होणार, याबाबत राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच निश्चित माहिती स्पष्ट होईल. गणेशोत्सवाच्या काळात हा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी अधिकृत तारखेची अद्याप प्रतीक्षा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!