Pune News : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ ४ मार्गांवर लवकरच धावणार वंदे भारत ट्रेन, जाणून घ्या..

Pune News : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातून दोन नव्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्च महिन्यामध्येच नव्याने १० वंदे भारत ट्रेन्सच्या मार्गांचं उद्घाटन केले. यामध्ये महाराष्ट्रातून मुंबई-अहमदाबाद मार्गावरही वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आली आहे.
आधीपासूनच महाराष्ट्रामध्येही अनेक मार्गांवर वंदेभारत ट्रेन धावतात. मुख्यत्वे मुंबईशी संलग्न मार्गांवर आतापर्यंत सुरुवातीच्या टप्प्यात वंदे भारत ट्रेन्स धावत आहेत. मात्र लवकरच पुण्याला वंदे भारत ट्रेन्सची मोठी भेट मिळणार आहे. Pune News
या ४ मार्गांवर पुण्यातून सुटणार वंदे भारत?
पुण्यातून ज्या मार्गांवर वंदे भारत सुरु होणार आहेत त्या मार्गांमध्ये पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते बेळगाव या ४ मार्गांचा समावेश आहे. या ४ ही वंदे भारत गाड्या या वर्षाच्या शेवटापर्यंत म्हणजेच डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत किंवा आर्थिक वर्ष संपण्याच्या आधी म्हणजेच मार्च २०२५ अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता वेगवेगळ्या मिडिया रिपोर्ट्समध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात एकूण ८ मार्गावर वंदे भारत ट्रेन धावतात. मुंबई-अमदाबाद ही महाराष्ट्रातील ८ वी वंदे भारत ट्रेन ठरली आहे. यापूर्वीपासूनच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स धावतात.