Pune News : पुण्यात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच, संचेती ब्रिजजवळ घराला आग…

Pune News : पुण्यात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. पुण्यात शिवाजीनगर संचेती हॉस्पिटलजवळ आगीची घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पुण्यात शिवाजीनगर संचेती हॉस्पिटलजवळ एका बंद घरामध्ये आग लागली आहे. या बंद असलेल्या घरात अचानक आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून ३ वाहनांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे. Pune News

शर्तीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली आहे. यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या वेळीच आल्या आहे. मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. बंद घरात आग नेमकी कशी लागली? की कुणी लावली? असं प्रश्न आता विचारले जात आहेत. आग लागताच घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली आहे.


Views:
[jp_post_view]