Pune News : पीएमआरडीएच्या विकास आराखड्यावरच प्रश्नचिन्ह! मुख्यमंत्र्यांच्या लेखी उत्तराने सगळेच संभ्रमात…


Pune News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील प्रारूप विकास आराखडा (डीपी) अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहे. हिवाळी अधिवेशनानंतर या आराखड्याला मंजुरी मिळेल, असे वाटत असताना मात्र तसे काही झाले नाही.

अधिवेशनात प्रारुप आराखड्यावर प्राप्त हरकती, सूचनांवर सुनावणी घेऊन पीएमआरडीएला अहवाल सादर करण्यासाठी नियोजन समिती गठित करण्यात येत असल्याचे सांगितले गेले. यामुळे आता पीएमआरडीएच्या विकास आराखड्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

याबाबत खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर आणि दौंडचे आमदार राहूल कुल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, प्रसिद्ध झालेला आराखडा प्रारूप आहे. हरकतींवर सुनावणी घेऊन नियोजन प्राधिकरणास अहवाल सादर करण्यासाठी नियोजन समिती गठित करण्यात येत आहे. Pune News

नगर आणि प्रदेश रचना / पर्यावरण या क्षेत्रातील चार तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली असून तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. ही समिती विहित मुदतीत प्राप्त सर्व हरकती, सूचना यांवर सुनावमी घेऊन त्याबाबतचा अहवाल प्राधिकरणाला सादर करेल.

प्राधिकरण आणि पुणे महानगर नियोजन समिती प्रारूप विकास योजनेत आवश्यक ते फेरबदल प्रस्तावित करून तो शासनाला अंतिम मंजूरीसाठी सादर करेल. त्यानंतर शासनाकडून त्याला अंतिम मंजूरी देण्यात येईल.

दरम्यान, नागरिकांकडून ६७ हजार हरकती, सूचना दाखल झाल्या. करोनामुळे या आराखड्याचे काम थांबले होते. त्यामुळे राज्य सरकारने त्याला मुदतवाढ दिली आहे.

दाखल हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी राज्य सरकराकडून डिसेंबर २०२१ मध्ये तज्ज्ञांची समिती नियुक्त करून हरकतीं-सूचनांचे नियोजन करून २ मार्च २०२२ पासून समितीने सुनावणी घेण्यास सुरूवात करून तब्बल दहा महिन्यानंतर म्हणजे डिसेंबर २०२२ मध्ये सुनावणी पूर्ण केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!