पुण्यात मेट्रोच्या कामामुळे ‘या’ भागातील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग…!


पुणे : पुण्यात महामेट्रोकडून वनाझ ते रामवाडी मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. या मार्गावर सर्व कामे झाली असली, तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतूजवळील ‘वायडक्ट’चे काम अद्याप करण्यात आलेले नाही.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतूजवळील जाणाऱ्या मेट्रो मार्गाच्या वायडक्टचे काम करण्यात येणार आहे.

 

त्यामुळे ३१ मार्च ते २१ एप्रिल दरम्यान या पुलावरून तारकेश्वर चौकाकडे जाणारी वाहतूक रात्री १० ते ६ वाजताच्या दरम्यान आवश्यकतेनुसार बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

 

पुढील २२ दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू रात्री वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यामुळे पुणे स्टेशनकडून बोट क्लबकडे जाणारी वाहने मोबाज चौक, डावीकडे वळून ढोले पाटील रोडने जातील.

 

तसेच बोट क्लब रोडने येऊन येरवड्याकडे जाणारी वाहने श्रीमान चौकातून वळून अमृतलाल मेहता रोडने कोरेगाव पार्क चौकातून जातील. पुणे स्टेशनकडून येरवड्याकडे जाणारी वाहने मोबाज चौक, मंगलदास रोडने, ब्लू डायमंड चौक, कोरेगाव पार्क जंक्शन, पर्णकुटीमार्गे जातील.

 

कल्याणीनगर मेट्रो स्टेशनच्या कामासाठी २८ मार्च ते २७ जूनदरम्यान ॲडलब चौकाकडे जाणारी व एन. एम. चव्हाण चौकाकडे जाणाऱ्या वाहतुकीत आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहे. याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!