Pune Crime : तुझ्या सारख्या बाया आहेत माझ्याकडे, पैसे मी रात्रीला खर्च करतो..!! पतीचे पैसे घेण्यास गेलेल्या महिलेचा कंपनी संचालकाकडून विनयभंग…

Pune Crime पुणे : पतीने केलेल्या कामाचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या महिलेला तुला किती पैसे पाहिजे सांग, साली तुझ्या सारख्या बाया आहेत माझ्याकडे असे पैसे मी रात्रीला खर्च करतो, असे म्हणून कंपनीच्या संचालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ही घटना कोथरुडमधील मयुर कॉलनीमधील फ्युचर टेक कंपनीत सोमवारी (ता.२८) दुपारी दोन वाजता घडली आहे.
याप्रकरणी एका ३१ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फ्युचर टेक कंपनीचे संचालक अमेय धनंजय गुर्जर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांच्या पतीने कंपनीत काम केले. त्या कामाचे पैसे घेण्यासाठी फिर्यादी पतीसह फ्युचर टेक कंपनीत गेल्या होत्या. त्यावेळी कंपनीचे संचालक अमेय गुर्जर यांनी फिर्यादी यांना “ए बाई तुझ्या तोंडाला कोण लागत नाही.
तुला किती पैसे पाहिजे सांग, तुझ्या नवर्याने तुला पुढं केलंय ना. किती पैसे पाहिजे सांग. साली तुझ्या सारख्या बाया आहेत माझ्याकडे, असे पैसे मी रात्रीला खर्च करतो, असे म्हणून अश्लिल शिवीगाळ केली.
हॉटेलमध्ये पार्टीसाठी बोलावले, दारु पाजून तरुणीवर केले हे कृत्य, पुण्यातील धक्कादायक घटना..
फिर्यादीच्या हाताला धरुन ऑफिस बाहेर ओढत नेऊन फिर्यादीच्या मनास लज्जा निर्माण केली. तसेच फिर्यादीचे उजवे हातातील बांगडी फुटून हाताला दुखापत झाली आहे.
आरोपीने धक्का दिल्याने फिर्यादी दरवाजाचे कडीवर जाऊन आदळल्याने फिर्यादीचे उजवे हाताला पोटरीजवळ दुखापत झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक काटकर तपास करीत आहेत.