राज्यात वादळी पावसाची शक्यता! मेघगर्जनेसह जोरदार कोसळणार, हवामान अंदाज आला समोर…


पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि वादळी पावसाने मोठं नुकसान झाले होते. असे असताना आता पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२ एप्रिलदरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात पाऊस पडणार आहे.

आभाळी हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, १९ एप्रिल रोजी पश्चिम  महाराष्ट्रातील घाट, तसेच उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. यामुळे याकाळात काळजी घ्यावी लागणार आहे. याबाबत हवामान खात्याने माहिती दिली आहे.

त्यानंतर २० आणि २१ एप्रिल रोजी पावसाच्या क्षेत्रात वाढ होण्याचे संकेत आहेत. ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह पुणे विभाग मराठवाडा आणि विदर्भातदेखील प्रामुख्याने अमरावती विभाग याठिकाणी काही प्रमाणात वादळी पाऊस पडेल, असेही सांगितले गेले आहे.

यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच शनिवारी प्रथमच तापमान ४५ अंशांवर पोहोचले. इतर जिल्ह्यांमध्येही तापमान चाळिशीच्या वरच राहिल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वर्धा याठिकाणी हे हवामान नोंदवले गेले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!