मोठी बातमी! बारामती-राहुरीच्या पोट निवडणुकीबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय, मतदारांना दिलासा…

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सध्या बारामतीची पोटनिवडणूक होत आहे. तसेच राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

आता या मतदारसंघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी बारामतीसह राहुरीत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मतदान करण्यास आता अडचण येणार नाही. सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या याबाबतीच अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केली आहे. ही सार्वजनिक सुट्टी २०१- बारामती विधानसभा मतदारसंघ आणि २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रासाठी आहे. उन्हाचा तडाखा देखील मोठा असल्याने अनेकजण मतदानास बाहेर पडणार की नाही अशी भीती देखील आहे.

तसेच या मतदारसंघातील जे मतदार कामासाठी त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच ही अधिसूचना राज्य व केंद्र शासनाचे कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम इतर प्रतिष्ठान यांनाही लागू राहील, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.
