युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले की कमी झाले? जाणून घ्या महत्वाची माहिती…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून जगात युद्धाचे सावट आहे. यामुळे याचा परिणाम अनेक गोष्टींवर होत आहे. सध्या तेल कंपन्या अनेकदा पेट्रोल डिझेलच्या दरात बदल करत आहेत. असे असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सरकारी तेल कंपन्यांनी कोणतीही वाढ किंवा घट केलेली नाही.

मध्यपूर्वेतील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात व्यत्यय येत असला तरी, २०२२ पासून सरकारी कंपन्यांचे इंधन दर स्थिर आहेत. खाजगी कंपन्यांच्या दरांमध्ये नुकतेच काही लक्षणीय बदल पाहायला मिळाले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत सरकार सर्व गोष्टी स्थिर ठेवत आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी शेवटची मोठी दरवाढ २०२२ मध्ये केली होती, मात्र अलीकडच्या काळात खासगी कंपन्यांच्या दरात लक्षणीय बदल पाहायला मिळाले आहेत. याबाबत माहिती अशी की, सरकारी क्षेत्रातील इंडियन ऑइलच्या विशेष XP100 पेट्रोलच्या किमतीतही १ एप्रिल रोजी मोठी वाढ झाली होती.

या प्रीमियम पेट्रोलचा दर ₹१४९ वरून आता ₹१६० प्रति लिटर झाला आहे. तर प्रीमियम डिझेलच्या दरातही किंचित वाढ होऊन ते ₹९२.९९ वर पोहोचले आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या चढ-उतारामुळे भविष्यात हे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.

खासगी क्षेत्रातील शेल इंडिया या कंपनीने १ एप्रिल २०२६ रोजी पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर ₹७.४ आणि डिझेलमध्ये ₹२५ ची मोठी वाढ केली होती. आज शेलच्या पंपांवर पेट्रोल ₹११९.८५ आणि डिझेल ₹१२३ प्रति लिटर दराने मिळत आहे. यामध्ये बदल दिसून येत आहे.
तसेच उच्च दर्जाच्या इंधनाबाबत बोलायचे झाल्यास, पॉवर पेट्रोलचा दर ₹१२९.८५ आणि प्रीमियम डिझेल ₹१३३ पर्यंत पोहोचले आहे. तसेच, नायरा (Nayara) या कंपनीने मार्चमध्येच पेट्रोलमध्ये ₹५ आणि डिझेलमध्ये ₹३ ची वाढ केली आहे.