Pune Crime : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाब विचारणाऱ्या वडिलांना बेदम मारहाण, पुण्यातील नाना पेठेत धक्कादायक घटना..

Pune Crime पुणे : पुणे शहरातून दररोज अनेक धक्कादाक घटना समोर येत आहे. तसेच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक नाना पेठेतुन समोर आली आहे. (Pune Crime)
एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना (Pune Crime) समोर आली आहे. तसेच याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन मुलीच्या वडिलांना मारहाण केली.
याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी (ता.१३) रात्री साडेसात ते नऊच्या दरम्यान नाना पेठेतील एका कॉलनीत घडला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी (वय. ३०) समर्थ पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता.१४) फिर्याद दिली. त्यानुसार अनिकेत संतोष गाडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळलेल्या माहिती नुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच परिसरात राहतात. आरोपीने फिर्यादी यांच्या १३ वर्षाच्या मुलीकडे पाहून शिट्टी मारून तिच्यासोबत गैरवर्तन करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केला.
फिर्यादी यांनी आरोपीकडे याचा जाब विचारला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. फिर्यादी यांनी तक्रार देताच पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.