Pune Crime : तो संशय अन् आयुष्य उध्वस्त! पतीने डोक्यात कुऱ्हाडीने वार करत पत्नीला संपवल, पुण्यातील धक्कादायक घटना..


Pune Crime : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरुन २५ वर्षीय पत्नीची डोक्यात कुऱ्हाड टाकून हत्या केली आहे. पुण्यातील वारजे येथील कर्वेनगर परिसर मंगळवारी (ता.२) ही घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पूजा लखन कांबळे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. लखन बालाजी कांबळे असे अटक केलेल्या आरोपी पतीने नाव आहे

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा आणि लखन मुळचे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आहेत. मात्र पुण्यातील कर्वेनगर परिसरात ते गेल्या काही वर्षांपासून राहत होते. लखन हा पत्नी पूजावर सतत चारित्र्यावरुन संशय घेत असे.

घरात या विषयावरुन त्यांच्यात सतत खडके उडत असत. मंगळवारी (ता.२) सकाळी देखील याच मुद्द्यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. मात्र या भांडणानंतर कुणालाही कल्पना नसेल असं विपरित घडले. Pune Crime

दोघांमध्ये भांडणावेळी शब्दाला शब्द वाढत गेले. यावेळी रागाच्या भरात लखनने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे पूजाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी लखनने तेथून पळ काढला आणि थेट त्याचं मूळ गाव गाठले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीचा शोध सुरु केला. आरोपी लखनला पोलिसांना यवतच्या दिशेने जात असताना अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!