Pune Crime : तिने भीती दाखवण्यासाठी पेट्रोल घेतले ओतून, पतीने लावली काडी अन्…: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


Pune Crime पुणे : दारु पिऊन घरी येऊन मारहाण करणार्‍या पतीला भिती दाखविण्यासाठी तिने अंगावर थोडेसे पेट्रोल ओतून घेऊन मी मरते आता, असे म्हणाली, त्यावर पतीने काडी ओढून तिला पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी अमृता अक्षय कुंजीर (वय २३, रा. वळती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अक्षय मारुती कुंजीर आणि आशा मारुती कुंजीर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वळती गावातील फिर्यादीच्या घरी १२ सप्टेबर रोजी दुपारी २ वाजता घडला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. फिर्यादी आणि अक्षय कुंजीर यांचा २०२० मध्ये प्रेमविवाह झाला आहे. त्यांना एक मुलगा आहे. अक्षय हा वारंवार दारु पिऊन येऊन मारहाण करतो. १२ सप्टेबरला तो असाच दारु पिऊन आला व घरातील सामानाची तोडफोड करीत होता. यावेळी तिची सासू व सासरे शेतात गेले होते.

त्यावेळी अक्षय याने तु घरातून निघून जा, तु घरात रहायचे नाही, असे म्हणाला. त्यावर फिर्यादी यांनी मी मरुन जाते, असे म्हणाल्या. शेतीपंपासाठी आणलेल्या पेट्रोलमधील थोडे पेट्रोल त्याला भिती दाखविण्यासाठी अंगावर ओतले.

त्यावेळी त्याने काडे पेटी आणून अंगावर टाकली. त्यामुळे त्या पेटल्या. त्यानंतर त्यानेच फिर्यादीच्या अंगावर पाणी ओतून विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत फिर्यादी यांची छाती, गळा व तोंडास गंभीर दुखापत झाली होती.

त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. तू जर तुला पतीने पेटविले, असे सांगितले तर दवाखान्यात उपचार करणार नाहीत, अशी भिती सासुने दाखविली. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला लोणी काळभोर पोलिसांना चुलीवर स्वयंपाक करताना अचानक पेट्रोल ओतल्याने भडका होऊन भाजले असे भितीपोटी सांगितले होते. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक खोसे तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!