Pune Crime : पुण्यात खळबळ! बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार, तरुणीच्या अंगावर विचित्र जखमा..

Pune Crime : सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत आहेत. काल (गुरूवारी) स्कुलबस चालकाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच आता शहरात आणखी एक अत्याचाराची घटना समोर आली आहे.
पुण्यात बोपदेव घाटात तरुणीवर गँगरेपची घटना घडली आहे. या प्रकरणाबाबत धक्कादायक खुलासे आता समोर येऊ लागले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर गँगरेप झाला असून तिच्या अंगावर जखमा आढळून आल्या आहेत. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.
संपूर्ण माहिती अशी की,, कोंडवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ वर्षीय तरुणी मित्रासोबत बोपदेव घाटात बुधवारी रात्री गेली होती. तिच्यावर तिघांनी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बलात्कार केला. ज्या ठिकाणी ही घटना घडली ती निर्जन अशी होती. Pune Crime
या घटनेची माहिती पोलिसांना पहाटे पाचच्या सुमारास मिळाली. पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली असल्याची माहिती सह आयुक्त रंजन शर्मा यांनी दिली.
बोपदेव घाटात मुलीवर गँगरेप झाला आहे. ही मुलगी जखमी अवस्थेत सापडली असून तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा असल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं आहे. जखमी अवस्थेतच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ससून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेतली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.