Pune Accident : हिट अँड रनप्रकरणाचा अहवाल आला, आरोपीने दारू घेतली होती का? अहवालात सगळी माहिती आली समोर…

Pune Accident : अल्पवयीन मुलाने दारू पिऊन, गाडी चालवून दोघांना उडवल्याचे हे प्रकरण सध्या फक्त पुण्यातच नव्हे तर राज्यभरात गाजत असून अवघ्या काही तासांतच त्याला जामीन मिळाल्यानेही संताप व्यक्त होत आहे.

आता याप्रकरणी आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अपघातावेळी त्या अल्पवयीन आरोपीने मद्यप्राशन केले होते असा दावा करण्यात आला होता, त्यानंतर त्याची चाचणी करण्यात आली. मात्र त्या चाचणीचा अहवाल येण्याआधीच न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.
अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि तपासणीसाठी ससून रुग्णालयात तसेच आणखी एका खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. अखेर आता या मुलाचा अहवाल आला असून ससून रुग्णालयाने तो अहवाल पोलिसांकडे सादर केला आहे. Pune Accident

काल रात्री पुणे पोलिसांना हा अहवाल देण्यात आला. अपघातावेळी त्या मुलाने मद्य घेतले होते की नाही ते या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. ससूनचा हा अहवाल आज पोलिसांकडून कोर्टात सादर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी काल छ. संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. सध्या ते फरासखाना पोलिसांच्या ताब्यात आहे. आज दुपारी २ वाजता त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार असून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.